जळगाव : प्रतिनिधी
शहरातील खंडेरावनगर परिसरात १३ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत दरवाजाला लाथा मारत असलेल्यांना जाब विचारल्याच्या कारणावरून तिघांनी दाम्पत्यासह एकाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खंडेरावनगरात योगेश हरीलाल सोनार हे वास्तव्यास असून, १२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याच परिसरात राहणारा एक जण दारूच्या नशेत त्यांच्या घराच्या दरवाजाला लाथा मारत होता. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास लाथा मारणारा आणखी दोन अनोखळी इसमांसह सोनार यांच्या घरी येऊन त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.