मुंबई : वृत्तसंस्था
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिलं आहे. पत्राच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. आज अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेतृत्व ज्यांनी विधानसभा आणि लोकसभा गाजवली, दोन वेळा ज्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले असे अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला असे देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केले आहे. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे महायुतीची शक्ती वाढली आहे. यात कुणाला शंका नाही.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, देशभरात माननीय मोदी यांनी ज्याप्रकारे भारताला विवकसीत करण्यासह स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचे काम केले. जो बदल भारतात दिसत आहे त्यामुळे अनेक नेत्यांना आपणही मुख्य प्रवाहात काम करावे मोदींच्या नेतृत्वात काम करावे, देशाला पुढे नेण्याच्या प्रयत्नात आपणही वाटा द्यावा असे विचार आहेत. अशोक चव्हाणांनी प्रवेश केला. त्यांनी एकाच सांगितले विकासाच्या मुख्य मुद्द्यासाठी आलो पदाची अपेक्षा नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यात महायुतीला विशेष बळ मिळेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.