पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारीच्या घटनेसोबत लुबाडण्याच्या देखील अनेक घटना घडत असतांना पुणे शहरात सध्या उत्तराखंडच्या “मशरूम गर्ल”ने एका नागरिकाला तब्बल ५७ लाख रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यवसायात भागीदारी करण्याचे सांगूण महिलेने या व्यक्तीची लाखोंची रोकड लंपास केली आहे.
जितेंद्र नंदकिशोर भाखाडा यांनी 2022 मध्ये फसवणुकीची तक्रार पौड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दिव्या रावत आणि तिचा भाऊ राजपाल रावत अशी आरोपींची नावे आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पौड पोलिसांनी या प्रकरणी या दोघांना ताब्यात घेतलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची प्रिक्वेल सिस्टम्स या नावाची एक कंसलटंसी होती.
फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला तांत्रिकशेती उद्योग करण्यासाठी त्यांनी अनेक जाहिराती पाहायला सुरुवात केली. त्यांची फेसबुकवर डेहराडून या ठिकाणी असलेल्या मशरूमची तांत्रिकशेती संदर्भात ओळख झाली. फिर्यादी हे डेहराडून येथे प्रषिक्षणासाठी गेल्यावर तेथे त्यांना शकुंतला रॉयची बहीण दिव्या रावत भेटली व तीने मशरूमच्या शेती संदर्भात माहिती दिली. काही दिवसांत तुम्हाला भागीदारी देते असं सांगत दिव्याने फिर्यादी यांना आमिष दाखवल. साल 2019 ते 2022 या कालावधीत फिर्यादी यांनी गुंतवणूक म्हणून दिव्याच्या सांगण्यावरून ५७ लाख रुपये जमा केले. आपली फसवणूक झालीय हे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठले. या संदर्भात आता पोलीस अधिक तपास करत आहेत.