जळगाव : प्रतिनिधी
पतीचे कर्ज फेडण्यासाठी विवाहितेने माहेरुन पाच लाख रुपये आणावे, यासाठी विवाहितेचा छळ केला जात असल्याची घटना दि. ११ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विवकानंद नगरातील माहेर असलेल्या नंदा विलास पाटील यांचे अमळनेर येथील विलास अशोक पाटील यांच्यासोबत विवाह झाला आहे. विवाहनंतर सासरच्या मंडळींनी विवाहितेच्या पतीने घेतलेले पाच लाखांचे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी माहेरुन पाच लाख रुपयांची मागणी केली. परंतु विवाहितेने त्यांची मागणी पुर्ण न केल्यामुळे सासरच्यांकडून विवाहितेचा छळ करीत मारहाण देखील करण्यात आली. यावेळी विवाहितेच्या पतीने त्यांना माहेरी पाठवून दिले. वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन तर पती विलास अशोक पाटील, जेठ कृष्णराव अशोक पाटील, जेठाणी सुवर्णा कुष्णराव पाटील दोघे रा. पुणे, न नणंद आरती सुर्यकांत पवार, नंदोई सुर्यकांत अर्जुन चर पवार दोघे रा. पिंपरी चिंचवड, चुलत जेठाणी अलका दिलीप पाटील रा. अमळनेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.