धुळे : वृत्तसंस्था
तालुक्यातील अकलाड मोराणे येथील एका निवासी शाळेत केतन विनायक मोरे नावाच्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने रविवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरच्या परिस्थितीअभावी पालकांनी त्याला स्पर्धा परीक्षेस नकार दिल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
केतन याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी व्हायचे होते. त्याने वडिलांना ही बाब बोलून दाखविली होती. परंतु, आपल्याला स्पर्धा परीक्षेचा खर्च झेपणार नाही, असे वडील म्हटल्याची बाब मनाला केतनने लावून घेतली. रविवारी सकाळी शाळेतील वसतिगृहाच्या बाथरूममध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केली.