पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे शहर गुन्हेगारीच्या माध्यमातून मोठ्या चर्चेत येत असताना नुकतेच पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खूनाची घटना समोर आली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या आईचा खून केला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, खडकी पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेत ५५ वर्षीय आईचा मुलाने निर्घुन पद्धतीने खून केला आहे. ज्ञानेश्वर असं आरोपी मुलाचं नाव आहे. आईला संपवल्यावर त्याने घरातून पळ काढला असून तो फरार आहे. गुंभाबाई शंकर पवार असं मृत आईचं नाव आहे.
आपल्या पोटच्या मुलाला वाढवताना लहानाचं मोठं करताना हा दिवस कधी पहावा लागेल याचा तिने विचारही केला नसेल. मुलाने आईची हत्या आपल्या राहत्या घरात केली. कुणाला संशय येऊनये म्हणून घराला कुलूप लावून त्याने तेथून पळ काढला. खडकी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.