जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील चिलगाव येथील शिवारात सुरू असलेल्या हातभट्टीवर पहूर पोलिसांनी छापा टाकत कच्चे रसायन नष्ट केले. या प्रकरणी गावठी दारूची विक्री करणाऱ्याविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिलगाव येथे पोलिस निरीक्षक सचिन सानप, पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील, गणेश सुस्ते, गोपाळ माळी, शशिकांत पाटील व पोलिस कर्मचाऱ्यांनी या दारुअड्ड्यावर छापा टाकत २ हजार ४०० लीटर कच्चे २४ इम गावठीचे रसायन नष्ट करून हुसेन तडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी येथील बंडू सुपडू तडवी याच्याविरुद्ध या प्रकरणात २० गुन्हे दाखल होते. अखेर त्याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत कारवाई करून अमरावती सबजेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात पोलिसांनी या परिसरात हातभट्टी व्यावसायिकांविरूध्द कारवाईचे अस्त्र हाती घेतले आहे.