जळगाव : प्रतिनिधी
जळगाव येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचालित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी संगणकशास्त्र विभागातर्फे राज्यस्तरीय iNOVA 2024 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये पोस्टर प्रेझेन्टेशन व ब्लाइंड कोडींग (C Language) या स्पर्धा पदवी व पदव्युत्तर गटातून घेण्यात आल्या. राज्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन श्री. पंकज अत्तरदे (CEO, Heuristic Technopark, Pune) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना “लेटेस्ट टेक्नॉलॉजी इन आयटी इंडस्ट्रीज” या विषयावर मार्गदर्शन केले.
सदर सेमिनार मध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सध्या वापरात असलेल्या क्लाऊड कॉम्प्युटिंग, क्वाँटम कॉम्प्युटिंग, डाटा सायन्स, इंडस्ट्री रेव्होल्युशन 1.0 ते 4.0 याबाबत सखोल मार्गदर्शन केले. उद्घाटन प्रसंगी धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीचे सचिव मा. डॉ. पी. आर. चौधरी सर उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना सांगितले की सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये टिकायचे असेल तर आपल्याला iNOVA सारख्या स्पर्धा अत्यंत आवश्यक आहेत. कारण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनच विद्यार्थी हा लेटेस्ट टेक्नॉलॉजीची माहिती मिळवू शकतो. या स्पर्धामध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थी भाग घेतात त्यांच्यासोबत नवनवीन आयडिया शेअर करण्याची सुद्धा संधी मिळते. म्हणून असे विविध उपक्रम आपण आपल्या महाविद्यालयाच्या वतीने नेहमीच आयोजित करीत असतो. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रमोद आर. चौधरी, श्री. विनय महाजन Director, Heuristic Technopark, Pune हे देखील या उपस्थित होते.
ब्लाइंड कोडींग या प्रकारामध्ये विद्यार्थ्यांना संगणकाचा मॉनिटर बंद करून प्रोग्राम टाईप करावा लागतो. पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मशीन लर्निंग, क्लाऊड कम्प्युटिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा, सायबर सिक्युरिटी, एडिशन टू सोशल मीडिया, अशा विविध अद्यावत विषयांवरती सादरीकरण केले. सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रा. सीमा राणे व प्रा. कल्याणी नेवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच त्यांनी परीक्षक म्हणून कामकाज केले. या स्पर्धेचा विविध निकाल पुढील प्रमाणे-
ब्लाइंड कोडींग पदवी गट
प्रथम क्रमांक – ऋषिकेश संभाजीराव देशमुख (IMR, जळगाव)
द्वितीय क्रमांक – ओम राजेंद्र पाटील (शिरीष चौधरी महाविद्यालय, जळगाव)
उत्तेजनार्थ – हिमांशू शांताराम पाटील (IMR, जळगाव)
ब्लाइंड कोडींग पदव्युत्तर गट
प्रथम क्रमांक – दीपिका महाजन (जी. एच. रायसोनी कॉलेज, जळगाव)
द्वितीय क्रमांक – आकाश भोळे (शिरीष चौधरी महाविद्यालय, जळगाव)
पोस्टर प्रेझेन्टेशन पदवी गट
प्रथम क्रमांक – मयुरी सोनवणे व तेजल पाटील (बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव)
द्वितीय क्रमांक – शेख मुबश्शेरा आरिफ व शेख ईफ्फत फातेमा सबीर (एच जे थीम कॉलेज, जळगाव)
उत्तेजनार्थ – जान्हवी शिंदे व आम्रपाली महाजन (बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव)
पोस्टर प्रेझेन्टेशन पदव्युत्तर गट
प्रथम क्रमांक – अर्चिता चौधरी व नेहा ठाकरे (क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ, जळगाव)
द्वितीय क्रमांक – आकाश भोळे व योगेश देशमुख (शिरीष चौधरी महाविद्यालय, जळगाव)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. प्रियंका बऱ्हाटे यांनी केले तसेच सूत्रसंचालन मेघा बारी आणि चिन्मय महाजन व प्रा. कुमुदिनी पाटील यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी स्पर्धेचे संयोजक प्रा. प्रशांत सावदेकर, प्रा. दिपाली महाजन, प्रा. प्रगती बारी, प्रा. खुशबु सरोदे, प्रा. दिपाली फालक तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुनिल पाटील, प्रा. वर्षा आठे, किशोरी अहिरराव, श्री. दीपक पाटील, संदीप पाटील, प्रवीण अंबूसकर, सुनिल सरोदे तसेच विभागातील विद्यार्थी यांचे अनमोल सहकार्य लाभले.