जळगाव : प्रतिनिधी
शहरातील स्वातंत्र्य चौक परिसरात चौघांकडे गावठी कट्टा आढळून आल्याप्रकरणी, तसेच पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणात चौघांना सुनावण्यात आलेल्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन रमेश सुशीर (१९, रा. पिंप्राळा हुडको), लखन दिलीप मराठे (३०, रा. शिवाजीनगर हुडको), सोनू उर्फ ललित गणेश चौधरी (२९, रा. ईश्वर कॉलनी), अतुल क्रिष्णा शिंदे (२५, रा. रामेश्वर कॉलनी) यांचा समावेश आहे.स्वातंत्र्य चौक परिसरात गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी चार जण वाद घालत असताना पोलिस त्या ठिकाणी पोहचले होते. त्या वेळी पोलिसांना चौघांनी धक्काबुक्की करत धमकी दिली होती. त्या वेळी त्यांच्याकडे गावठी कट्टा आढळून आला होता.