• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुलीचे फोटो काढल्याचा संशय : रिक्षाचालकाला चोप

editor desk by editor desk
February 10, 2024
in क्राईम, जळगाव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

जळगाव : प्रतिनिधी

येथील शिरसोली रस्त्यावर असणाऱ्या रायसोनी इन्स्टिट्यूटच्या महाविद्यलयातील काही विद्यार्थिनींचे फोटो काढत असल्याच्या संशयावरून एका रिक्षाचालकाला तरुणांनी बेदम चोप दिल्याची घटना शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी संतप्त तरुणांनी रिक्षाची तोडफोड करीत रिक्षा उलटवून दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसानी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती – नियंत्रणात आणली. रिक्षाचालकाला पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायसोनी इन्स्टिट्यूटची विविध महाविद्यालये शिरसोली रस्त्यावर आहे. या महाविद्यालयात शेकडो मुले मुली प्रवेशित आहेत. दरम्यान गेल्या दीड वर्षांपासून मुले-मुलींसाठी महाविद्यालयाची बस – नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. बसअभावी विद्यार्थ्यांना रिक्षाचाच पर्याय आहे.

याचाच एका तांबापुरा येथील रिक्षाचालकाने गैरफायदा घेत काही दिवसांपासून तो महाविद्यालयातील विद्यार्थीनीचे फोटो काढत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता काही तरुणांना माहिती मिळताच त्यांनी या रिक्षाचालकांचा मोबाईल तपासला. त्यात त्यांना आणखी काही मुलींचे फोटो दिसले. यानंतर संतप्त झालेल्या तरुणांनी त्याला चोप दिला. तसेच, त्याच्या रिक्षाची प्रचंड तोडफोड करून ती महाविद्यालयासमोरच उलटून दिली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणून त्यांनी रिक्षाचालकाला पोलीस ठाण्यात नेले आहे. दरम्यान, यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.

Previous Post

दोन गटात वाद : ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

तीन दिवसापूर्वी चाळीसगावात गोळीबार : माजी नगरसेवक महेंद्र मोरेंचा मृत्यू

Next Post
चारचाकीतून आलेल्या पाच जणांनी झाडल्या माजी नगरसेवकावर गोळ्या

तीन दिवसापूर्वी चाळीसगावात गोळीबार : माजी नगरसेवक महेंद्र मोरेंचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group