लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : चोपडा येथील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटनखान्यावर पोलीसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात २३ तरूणींची सुटका करण्यात आली आहे. यावेळी वेश्या व्यवसाय करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी ११ महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात अवैधरित्या कुंटनखाना सुरू असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक ऋषीकेश रावले यांना मिळाली होती. सहाय्यक अधीक्षक रावले यांच्या माहितीनुसार चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण आणि चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्यासह पथकाने बुधवारी २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात असलेल्या एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. कुंटणखान्यात पोलिसांना मिळून आलेल्या जिल्ह्यासह परराज्यातील तब्बल २३ तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
दरम्यान, या परीसरात मध्यप्रदेश, आंध्रा, पश्चिम बंगाल, कलकत्तासह नेपाळमधील तरुणींना आणले जात असून त्यांच्याकडून देहव्यापार केल्या जात आहे. वारंवार कारवाया होऊन सुद्धा या परिसरात देह व्यापार केल्या जात आहेत.