• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बाळासाहेबांच्या शिकवणी नुसार गोर- गरिबांची सेवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

हनुमंतखेडा येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण व पा. पु. योजनेची पाहणी

editor desk by editor desk
February 8, 2024
in जामनेर, धरणगाव
0
बाळासाहेबांच्या शिकवणी नुसार गोर- गरिबांची सेवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

जळगाव : प्रतिनिधी

जलजीवन मिशन योजना सामन्यांचे जीवन सुकर करणारी व जनतेला वरदान ठरणारीआहे. लहान मोठे पुलांचे काम करून रस्त्यांचे जाळे विणले आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या रस्त्यांना प्राधान्य दिले आहे. ८०% समाजकारण व २०% राजकारण या बाळासाहेबांच्या शिकवणी नुसार गोर- गरिबांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत असून हनुमंतखेडा येथे उर्वरित रस्त्यांवर पेव्हिग ब्लॉक बसवून १०० % पेव्हिंगचे गाव करणार असल्याची ग्वाही दिली. सिझनेबल पुढाऱ्यांना जनता थारा देत नसून जनता त्यांचा टांगा पलटी घोडे फरार कधी करेल सांगता येत नसल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हनुमंत खेडा येथे विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी केले.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सत्कार केला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुलभूत सुविधेंअंतर्गत ( २५१५) गावअंतर्गत काँक्रीटीकरण १४ लक्ष, सामाजिक न्याय विभाग अंतर्गत पथदिवे ७.५० लक्ष या कामांचे लोकार्पण करण्यात आले तर सुरू असलेल्या ८८ लाखाच्या पाणीपुरवठा योजनेची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. यात दोन पाण्याच्या टाकी, एक विहीर, गावात पाईपलाईन, पंप हाऊस या कामांचा समावेश आहे. यावेळी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, तालुका प्रमुख डी.ओ. पाटील, गजानन पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. येथील शाखा प्रमुख सुनील पाटील यांची मुलगी व नुकतीच पोलीस भरतीत मेरीटला आलेली कु. दिव्या पाटील हिच्या भाषणाने पालकमंत्र्यांसह मान्यवर व ग्रामस्थ भारावून गेले. तिचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कौतुक करून तिचा सत्कार केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भैया मराठे सर यांनी केले तर आभार शाखा प्रमुख सुनील पाटील यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सदस्य, शिवसेना व युवसेना कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतेले. यावेळी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, गजानननाना पाटील माजी, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, माजी सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील सचिन पवार, मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंदराव नन्नवरे, सरपंच हुकुम पाटील, उपसरपंच विक्रम सोनवणे, शाखा प्रमुख सुनील पाटील, रतीलाल पाटील, ग्रा.पं. सदस्य रमाकांत पाटील, प्रशांत पाटील, समाधान पाटील, किशोर सोनवणे, दीपक पाटील, परिसरातील सरपंच गोरख पाटील, आबापातील, निशांत पाटील, बंटी पाटील, युवासेनेचे पवन पाटील, किरण पाटील, दिपक भदाणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

माझं हिरावू नका हवं असेल तर नव्याने ; मंत्री भुजबळ आक्रमक

Next Post

चाळीसगावात माजी नगरसेवकावर गोळीबार : सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
चारचाकीतून आलेल्या पाच जणांनी झाडल्या माजी नगरसेवकावर गोळ्या

चाळीसगावात माजी नगरसेवकावर गोळीबार : सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group