नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर बाहेर पडत आहे. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते “मंडलनामा” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर देखील मंचावर उपस्थित होते. यावेळी मंत्री भुजबळ यांनी पुन्हा एकदा आपली आक्रमक भूमिका मांडली आहे.
मंत्री भुजबळ म्हणाले कि, सगळे म्हणतात भुजबळ जाती जातीत भांडण लावतायेत. परंतु माझं एवढंच म्हणणे आहे माझं हिरावू नका हवं असेल तर नव्याने घ्या. असं विधान त्यांनी केले आहे. अवघ्या काही दिवसात सर्व्हे पूर्ण करण्यात आला त्यावरूनही त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. ओबीसी समाजाच्या मंडल आयोग कसा मान्य केला गेला. त्यासाठी कितीवेळ लागला हे सांगत भुजबळ यांनी मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आहेत का हे तपासण्यासाठी करण्यात आलेल्या सर्व्हेवरून प्रश्न केला.
जर पंधरा दिवसात हा सर्व्हे झाला तर दोन तीन महिन्यात जाती जनगणनाही होईल, मग ती करावी असं छगन भूजबळ म्हणाले. काँग्रेसही तेच बोलत आहे, बावनकुळे काहीतरी बोलत आहेत. शरद पवार बोलले आहेत. अजित पवार काहीतरी बोले, आम्ही सगळं मानायला तयार आहोत. तर जाती गणना केली पाहिजे असं भुजबळ म्हणालेत.