Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » डोळ्यात मिरची टाकून २५ वर्षीय तरुणाचा खून
    क्राईम

    डोळ्यात मिरची टाकून २५ वर्षीय तरुणाचा खून

    editor deskBy editor deskFebruary 8, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    उल्हासनगर : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक जिल्ह्यात खुनाच्या घटना नेहमीच घडत असतांना उल्हासनगर मध्ये आज गुरुवार पहाटे एका युवकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समाेर आली आहे. प्राथमिक माहितीनूसार डोळ्यात मिरचीचा स्प्रे मारून युवकास मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्या डोक्यात कडप्पा लादी घालून त्याची हत्या करण्यात आली. राहुल महेंद्र जयस्वाल (वय 25) असे मृत युवकाचे नाव असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

    ही घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन भागात असलेल्या इमलीपाडा परिसरात आज पहाटेच्या सुमारास घडली. राहुल जयस्वाल हा इमलीपाडा परिसरात आला हाेता. त्यावेळी काही तरुणांनी त्याला घेरले आणि त्याच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारून त्याला मारहाण केली.
    तरुणांनी त्याच्या डोक्यात कडप्पा लादी घालून त्याची निर्घृण हत्या केली. ही हत्या पूर्ववैमन्यासातून झाली असल्याची चर्चा दबक्या आवाजात हाेऊ लागली आहे. या घटनेने येथील वाल्मीक नगर, इमलीपाडा तसेच फॉरवर्ड परिसरात खळबळ माजली आहे. घटनास्थळी मध्यवर्ती पोलीस तसेच फॉरेन्सिक टीम पोहोचली असून घटनेचा पंचनामा केला जात आहे. राहुल जयस्वाल याचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पाेलीस अधिक तपास करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.