लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जामनेर तालुक्यातील पाचोरा रस्त्याकडे जाणाऱ्या टाकळी गावाजवळ नागदेवता मंदिर परिसरात भरधाव जाणाऱ्या आयशर वाहनाने इंडिका कारला कट मारल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. इंडिका कार नाल्यात कोसळून त्यातील एक पुरुष व महिला जागीच ठार झाले उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाला आहे आज रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. यात आणखी 2 जण अत्यवस्थ असून सहा महिन्याचे बाळ अपघातातून वाचले आहे.
याबाबत माहिती अशी की, भुसावळ येथील नागरिक पाचोराच्या दिशेने लग्नकार्याच्या निमित्ताने इंडिगो कार क्र. (एम एच १८ डब्ल्यू २४१२) ने निघाले होते.
कार पकंज गोविंदा सैंदाणे (वय-२५, रा. तुकाराम नगर, भुसावळ) हे चालवत होते. कारमध्ये सुजाता प्रविण हिवरे (वय-३०, रा. त्रिमुर्ती नगर, भुसावळ), हर्षा पंकज सैंदाणे, नेहा राजेश अग्रवाल, प्रतिभा जगदीश सैंदाणे आणि लहान बाळ स्पंदन पंकज सैंदाणे (वय-१) बसलेले होते. पहूर जामनेर रस्त्यावर असलेल्या नागदेवता मंदीराजवळून जात असतांना औरंगाबाद कडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने कट मारल्याने कार चालक पंकज सैंदाणे याचा कारवरील ताबा सुटल्याने कार बाजूच्या नाल्यात कोसळली. यात कार चालक पंकज सैंदाणे आणि सुजाता हिवरे यांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेले हर्षा पंकज सैंदाणे, नेहा राजेश अग्रवाल, प्रतिभा जगदीश सैंदाणे हे तिघे गंभीररित्या जखमी झाले आहे यात उपचार सुरू।असताना प्रतिभा जगदीश सैदाणे याचा मृत्यू झाला आहे सुदैवाने १ वर्षाचे बाळ वाचावले आहे.
आयशर वाहनधारक वाहनासहित फरार झालेला आहे. त्याचा शोध सुरू केला असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, जामनेर तालुक्यात पॅजो रिक्षा – ट्रक यांच्या अपघातात तीन जणांना प्राण गमवावे लागले असल्याची घटना घडली होती. त्याला दोन दिवस उलटत नाही तोच हा अपघात झाल्याने जामनेर सह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.