Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » माझ्या प्रेयसीसोबत कशाला बोलतो : एकावर चाकू हल्ला
    क्राईम

    माझ्या प्रेयसीसोबत कशाला बोलतो : एकावर चाकू हल्ला

    editor deskBy editor deskFebruary 7, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नंदुबार : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक शहरात छोट्या मोठ्या कारणाने गुन्हेगारी वाढू लागली असतांना नुकतेच नंदुरबार जिल्ह्यात देखील एक घटना घडली आहे. आपल्या प्रेयसीसोबत बोलत असल्याच्या संशयातून एकाने रिक्षा चालकावर चाकूने हल्ला करून जखमी केले. पोहरा (ता. अक्कलकुवा) शिवारात ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली होती. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नितेश तुळशीदास तडवी (रा. पोहरा) असे हल्ला झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, नितेश हा रविवारी सायंकाळी रिक्षा घेऊन अक्कलकुवा येथून पोहरा गावाकडे जात असताना रोशन सौंदऱ्या वसावे (२८) व वेच्या दिलवर तडवी (२७, दोघे रा. पोहरा, ता. अक्कलकुवा) यांनी त्यास अडवले होते. यावेळी रोशन वसावे याने तू माझ्या प्रेयसीसोबत कशाला बोलतो असे बोलून मारहाण केली.

    यादरम्यान रोशन याने खिशातून चाकू काढून कंबर आणि मनगटावर वार केला होता. यातून नितेश हा जखमी झाला होता. यावेळी वेच्या तडवी यानेही नितेश याला मारहाण केली होती. यादरम्यान नितेश याचा बचाव करण्यासाठी आलेल्या संतोष तडवी यालाही दोघांनी मारहाण केली. जखमी नितेश तडवी याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी नितेश तडवी याने दिलेल्या फिर्यादीवरून रोशन वसावे (२८) व वेच्या दिलवर तडवी (२७) या दोघांविरोधात अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक देविदास वडघुले करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.