जळगाव शहरात पुन्हा एकदा वाळू माफ यांचा हैदोस सुरू झालेला आहे रात्रीच्या सुमारास जळगाव भुसावळ महामार्गावर निवासी जिल्हाधिकारी गस्तीवर असताना त्यांना अनोळखी वाळूमाफेंनी त्यांच्या चारचाकी शासकीय गाडीवर हल्ला केला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव भुसावल महामार्गावर रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवैध वाळूमाफिया सुरू असते याची माहिती निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांना मिळाली असता त्यांनी लागलीच या परिसरात गस्तीवर गेले असता अनोळखी वाळू माफियांनी त्यांच्या शासकीय गाडीची तोडफोड करीत त्यांच्यावर देखील हल्ला केला आहे. या घटनेत निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार हे जखमी झाले असून घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले आहे. या घटनेची माहिती महसूल व पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली होती. जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर उपचार सुरू केले आहे. यावेळी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक नखाते, संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, जिल्हा पेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते.