जळगाव : प्रतिनिधी
शहरातील अनेक परिसरात चोरीच्या घटना नेहमीच घडत असतांना दि.२५ रोजी हरीविठठल नगर परिसरातून २ बोकड व २ बकरी चोरी झाल्या होत्या. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवीत तीन बकरी चोरांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील हरीविठठल नगर परीसरात राहणारे विजयकुमार नंदलाल कुमावत यांचे राहते घरासमोरुन दि. २५/१०/२०२३ रोजी ०२ बोकड व ०२ बकरी असा एकुण ३९,०००/- रुपये किमतीचा मुददेमाल चोरुन नेला होता. सदर बाबत विजयकुमार कुमावत यांनी रामानंद नगर पोस्टेस गुन्हा दाखल करण्यात आले नंतर सपोनि विठठल पाटील, प्रभारी अधिकारी रामानंद नगर पो.स्टे. यांनी सदर उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग जळगाव यांचे मार्गदर्शन व सुचनांनुसार सदर गुन्हयाची तपासाची सूत्रे फिरवली गुप्त बातमीदारामार्फत चोरीचे बोकड व बक-यांची माहीती मिळवली.
त्यानुसार माहीतीचे आधारे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी संशयीत आरोपीस ताब्यात घेवुन त्याचेकडुन गुन्हयातील मुददेमालाबाबत माहीती घेतली. आरोपी नामे १. शाहरुख खान उस्मान भिस्ती वय- ३० २. सैय्यद रईस उर्फ पावडर रमाजान मणियार वय-२७ ३. नईम रहेमान भिस्ती वय-२५ सर्व रा. पिंप्राळा हुडको, जळगाव यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेले ०२ बोकड व ०२ बकरी असा एकुण ३९,०००/- रुपये किमतीचा संपुर्ण मुददेमाल तसेच गुन्हयात वापरलेल्या १,४०,०००/- रुपये किमतीच्या ०२ रिक्शा अश्या एकुण १,७९,०००/- रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. करीता वरील नमुद आरोपी यांना दि.०२/०२/२०२४ रोजी अटक करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचे तपासात श्री. संदीप गावीत, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी, जळगाव भाग जळगाव यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे सपोनि / विठठल पाटील प्रभारी अधिकारी रामानंद नगर पोस्टे जळगाव यांनी गुन्हे शोध पथकाचे पोह/संजय सपकाळे, जितेंद्र राजपुत, सुशिल चौधरी, जितेंद्र तावडे, इरफान मलीक, पोना/हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, विनोद सुर्यवंशी, अतुल चौधरी, पोशि/रविंद्र चौधरी, जुलालसिंग परदेशी यांनी गुन्हयाचे तपासात सहभाग घेतला असुन गुन्हयाचा मुददेमाल हस्तगत करण्याची कामगिरी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना/हेमंत कळसकर हे करीत आहेत.