Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील खुनातील कैदीचा रुग्णालयात मृत्यू
    क्राईम

    जळगावातील खुनातील कैदीचा रुग्णालयात मृत्यू

    editor deskBy editor deskFebruary 6, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील एका खूनाच्या गुन्ह्यात संशयित म्हणून जिल्हा कारागृहात असलेल्या एका कैद्याचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात भीमा उर्फ पंकज अशोक वाणी (वय-४०) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शनीमंदीर परीसरातील एका पत्त्याच्या क्लबमध्ये दि.१८ एप्रिल २०१७ रोजी प्रविण उर्फ नितीन सुरेश माळी या तरूणाच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. प्रकरणात पंकज वाणी हा मुख्य संशयित आरोपी म्हणून जिल्हा कारागृहात बंदीवान कैदी होता. या प्रकरणात संशयित म्हणून पंकज वाणी आणि राहूल सपकाळे यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहातच होता.

    गेल्या सहा ते सात महिन्यांपासून पंकज वाणी याला दुर्धर आजार झालेला होता. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली होती. यासाठी त्याला आतापर्यंत १० ते १२ वेळा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. ३ फेब्रुवारी रोजी त्याची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतांना मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची गर्दी पहायला मिळाली. मयत पंकज वाणीच्या पश्चात आई आणि तीन भाऊ असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.