Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलीस उपनिरीक्षकाने घेतला गळफास !
    क्राईम

    पोलीस उपनिरीक्षकाने घेतला गळफास !

    editor deskBy editor deskFebruary 6, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक शहरात तरुण व तरुणी आत्महत्या होत असल्याच्या घटना नेहमीच घडत आहे. नुकतेच नागपूरमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गोपाळ गोळे असं 34 वर्षीय मृतक पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. मानसिक तणावातून जीवन संपवलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस वसाहतीत ही घटना घडली आहे. गोपाल गोळे मागील तीन दिवसांपासून कार्यरत असलेल्या यशोधरानगर पोलीस ठाण्यात सुद्धा गेले नव्हते, अशी माहिती देखील समोर आली आहे.

    गोपाल गोळे यांच्या पत्नी मागील काही दिवसांपासून घरी नव्हत्या. मात्र मागील तीन दिवसांपासून गोळे यांचा फोन बंद असल्याने पत्नीला संशय आला. त्यानंतर गोळे यांच्या कुटुंबियांना याबाबत पोलीस स्टेशनमध्ये फोन करुन चौकशी केली. त्यावेळी ते पोलीस स्टेशनलाही आले नसल्याची माहिती मिळाली. गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या दोन कर्मचारी गोळे यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी गोळे हे घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे पोलिसांना अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.