Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ह्र्दयद्रावक : सिमेंटचा पाईपखाली दबून चौथीतील चिमुकल्याचा मृत्यू !
    क्राईम

    ह्र्दयद्रावक : सिमेंटचा पाईपखाली दबून चौथीतील चिमुकल्याचा मृत्यू !

    editor deskBy editor deskFebruary 5, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यवतमाळ : वृत्तसंस्था

    राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेटचे पीच तयार करण्यासाठी आणलेल्या सिमेंटचा पाईपखाली दबून चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. यात आर्यन जयेश चव्हाण (वय १०) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, वडसद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या आर्यन हा त्याचे वडील इंदापूर येथील रहिवासी असून आई-वडील ऊस तोडीवर गेले असता त्यांनी मुलाला आपल्या आजी-आजोबाकडे शिक्षणासाठी ठेवले होते. शनिवारी (३ फेब्रुवारी) शाळा सुटल्यानंतर आर्यन आपल्या मित्रांसोबत खेळण्यासाठी शेतशिवारात गेला. त्याठिकाणी काही तरुणांनी क्रिकेटची पीच तयार करण्यासाठी मोठा सिमेंटचा पाईप आणला. आर्यन आणि त्याचे मित्र या पाईपवर चढून खेळू लागले. दरम्यान, खेळता-खेळता काही मुलांनी सिमेंटचा पाईप ढकलला. त्यामुळे आर्यन धाडकन जमिनीवर कोसळला. काही क्षणातच त्याच्या अंगावरुन सिमेंटचा पाईप गेला.

    डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आर्यनचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर मुलांनी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस तपास करत आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.