Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अपघात कॅमेऱ्यात कैद : कारने दिली दुचाकीला जबर धडक !
    क्राईम

    अपघात कॅमेऱ्यात कैद : कारने दिली दुचाकीला जबर धडक !

    editor deskBy editor deskFebruary 4, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक शहरात अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच पालघरमध्ये एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चारचाकी वाहन आणि बाईकमध्ये जोरदार धडक झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तीन जखमी झाले असून सर्वांवर उपचार सुरु आहे. अपघाताची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पालघरच्या बोईसर चिल्हार एमआयडीसी मार्गावर गुंदलेजवळ हा अपघात झाला आहे. भरधाव चारचाकी वाहनाने बाईकला धडक दिली. अपघाताची घटना चारचाकी वाहनाच्या डेस्क बोर्डवर लावलेल्या कॅमेरात कैद झाली. व्हिडीओमध्ये दिसतंय त्यानुसार, चारचाकी वाहन वेगाने धावत असताना अचानक समोर बाईक आडवी येते.

    पालघर – बोईसर चिल्हार एमआयडीसी मार्गावर गुंदले जवळ अपघात, Video Viral#palghar #accident #viralvideo pic.twitter.com/FQAFdu3bsL

    — PravinW🇮🇳 (@pravinwakchoure) February 4, 2024

    वाहन चालकाने वेग कमी करुन वाहन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तरीही बाईकला जोरदार धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की बाईकवरील दोघे जण बाजूला फेकले गेले आणि बाईक बरीच दूर घसरत गेली. धडकेनंतर मोठा आवाज झाला. या आवाजानंतर आजूबाजून लोक मदतीसाठी धावले. अपघातात बाईकचं मोठं नुकसान झालं आहे. तर बाईक वरील दोन जन गंभीर जखमी तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.