जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दंगल, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला व जाळपोळ करणे असे २६ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तीन जणांच्या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. यामध्ये टोळी प्रमुख मुकेश प्रकाश भालेराव (वय २७, रा. राहुलनगर याच्यासह भरत मधुकर महाजन (वय २७, रा. शिवपूर कन्हाळा रोड) व शामल शशिकांत सपकाळे (वय २७, रा. न्यू. सातारा, भुसावळ) यांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील गुन्हेगारीला रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून कठोर कारवाईचे पाऊल उचलले जात आहे. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांसह टोळींवर देखील कारवाई केली जात आहे. दरम्यान, भुसावळातील टोळीने – गुन्हे करणाऱ्या टोळीवर भुसावळ शहरव तालुका, शनिपेठ पोलीस स्टेशन, यावल, फैजपुर याठिकाणी खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, जाळपोळ करणे, गंभीर दुखापत, दंगल, स्त्री अत्याचार, घातक हत्यार बाळगणे, दुखापत, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, गैर कायदा दारु बाळगणे, आदेशांचे उल्लंघन करणे, मारमारी, शिवीगाळ यासह तब्बल २६ गंभीर गुन्हे या टोळीने करुन त्यांनी दहशत परविलेली आहे.