Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलीवर अत्याचार : महिलेसह तीन अटकेत
    क्राईम

    अल्पवयीन मुलीवर अत्याचार : महिलेसह तीन अटकेत

    editor deskBy editor deskFebruary 4, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    शहरातील मालेगावरोडवरील बायपास परिसरातील एका हॉटेलमध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने हॉटेल मालक व त्याच्या मित्राने तिला धमकी देत बलात्कार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिवारी सायंकाळी महिलेसह तिघांना ताब्यात घेतले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील एका अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये काम देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले होते. त्यावेळी हॉटेलमालक आणि त्याठिकाणी उपस्थित असलेला त्याचा मित्र यांनी तिच्यावर जबरदस्ती केली. ही अल्पवयीन मुलगी एका महिलेच्या मदतीने हॉटेलवर बोलावण्यात आल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

    दरम्यान, या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून दिवसभर याच घटनेची सर्वत्र चर्चा होती. घटनेची माहिती माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक अभयसिंह देशमुख यांनी शहर पोलिस स्टेशनला भेट घटनेची माहिती जाणून घेतली. ही घटना १८ जानेवारी रोजी घडली असली तरी याबाबतची माहिती पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी पोलिस स्टेशनला शनिवारी दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी पोलिस सहकाऱ्यांच्या मदतीने तातडीने महिलेसह तिघांना ताब्यात घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.