जळगाव : प्रतिनिधी
प्रा. संदीप दिलीप पाटील यांना विद्यावाचस्पती (Ph.d). झाल्याबद्दल आमदार किशोर भाऊ दराडे यांच्या शुभहस्ते व जुक्टो संघटना व माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला.
दिनांक 2 फेब्रुवारी रोजी शिक्षक दरबार कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार किशोर भाऊ दराडे जळगाव येथे आले असता .त्या कार्यक्रमांतर्गत प्रा. संदीप दिलीप पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. यांच्या वतीने विद्यावाचस्पती पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली आहे.
प्रा. संदीप पाटील हे किसान कनिष्ठ महाविद्यालयात सेवेत कार्यरत आहेत. त्यांच्या संशोधनाच्या विषय जळगाव “जिल्ह्यातील शिलालेखांच्या चिकित्सक अभ्यास “या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला. त्यांचे मार्गदर्शक म्हणून प्रो. डॉ .सुधाकरराव सु. देशमुख होते त्यांना या शोध प्रबंधासाठी पीएचडी मिळाल्याबद्दल माध्यमिक पतसंस्थेच्या कार्यक्रमात त्यांच्या गौरव करण्यात आला. याप्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष एस.डी.भि रुड सर संस्थेचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील सर जुक्तो संघटनेचे मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड कार्याध्यक्ष शैलेश राणे व माध्यमिक पतसंस्थेचे संचालक उपस्थित होते. तसेच संस्थाध्यक्ष सतीश भास्करराव पाटील प्राचार्य डॉ .यशवंतराव विठ्ठल पाटील व इतिहास विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ .बी .टी .पाटील यांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.