जामनेर : प्रतिनिधी
तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पक्षाचे नेते प्रदेश सदस्य बंगालसिंह चितोडिया यांचे अध्यक्षतेखाली जामनेर येथे नुकतीच संपन्न होऊन पक्ष बांधण्यासाठी संपूर्ण तालुक्यात युवा जागर यात्रेचा शुभारंभ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
युवा जागर यात्रा जिल्ह्यासह जामनेर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटामधून तसेच प्रत्येक गावातून जाणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष अरविंदभाऊ चितोडिया यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी अजित दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत व्हावा या उद्देशाने व तालुक्यातील तरुण वर्गाने जास्तीत जास्त संख्येने अजित दादांच्या सोबत यावे. असे आवाहन अरविंद भाऊ चितोडिया यांनी केले. बैठकीत स्थानिक तालुका नेते प्रदेश सदस्य बंगालसिंह चितोडिया, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रसंगी भावी मुख्यमंत्री म्हणुन आपल्याला अजित दादा यांना करावयाचे असल्याने सर्वांनी यासाठी प्रयत्नशील राहावे अशी भूमिका देखील अरविंद भाऊ चितोडिया यांनी यावेळी मांडली.
प्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आपल्यालाच मिळणार आहे आणि पक्षाच्या चिन्हासह अजित दादांचे नाव घरा घरात पोहोचवायचे असून संपूर्ण जिल्हा भरात यासाठी गावा गावात शाखांची स्थापना करावयाची आहे. भावी मुख्यमंत्री म्हणुन आपल्याला अजित दादा यांना करावयाचे असल्याने सर्वांनी यासाठी प्रयत्नशील राहावे अशी भूमिका जळगांव जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया यांनी मांडली.