Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भाजपच्या आमदाराने केला शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार : व्हिडीओ झाला व्हायरल
    क्राईम

    भाजपच्या आमदाराने केला शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार : व्हिडीओ झाला व्हायरल

    editor deskBy editor deskFebruary 3, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात भाजपच्या आमदाराने सत्ताधारी शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याची घटना घडल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. आता याच घटनेचा व्हिडीओ व्हायरल होवू लागला आहे. त्यात भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर खुलेआमपणे गोळीबार केल्याचे दिसून येत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे गणपत गायकवाड यांनी आपण स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा केला होता. पण या फुटेजमुळे त्यांचा हा दावा निखालस खोटा असल्याचे स्पष्ट होत आहे.

    गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी रात्री उल्हासनगरच्या हिल पोलिस ठाण्यात शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरमी पोलिसांनी गणपत गायकवाड यांच्यासह 3 जणांना अटक केली आहे. जमिनीचा वाद व आपसातील वैमनस्यातून ही घटना घडल्याचा दावा केला जात आहे. सध्या महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

    गोळीबाराच्या या घटनेचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात भाजप आमदार गणपत गायकवाड शांतपणे खुर्चीत बसलेल्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करताना दिसून येत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, गायकवाड यांनी एकूण 7 गोळ्या झाडल्या. त्यापैकी 6 गोळ्या महेश यांना लागल्या. भयंकर म्हणजे गणपत गायकवाड व्हिडिओत गोळीबार केल्यानंतरही थांबताना दिसत नाहीत. ते गोळ्या लागल्यानंतर खाली महेश यांना जवळ जावून बेदम मारहाण करतानाही दिसून येत आहेत.

    व्हिडिओत गोळीबाराचा आवाज ऐकून पोलिस अधिकारी धावत घटनास्थळी येतानाही दिसून येत आहेत. तर त्यावेळी तिथे उपस्थित असणारी इतर मंडळी पळून जाताना दिसत आहे. दुसरीकडे, या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दुपारी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन महेश शिंदे यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. डॉक्टरांच्या माहितीनुसार, महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असून, ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या शरीरातून 6 गोळ्या बाहेर काढण्यात आल्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.