लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : धरणगाव तालुक्यातील चमगाव गावाजवळील शिवारात असलेल्या नदीच्या काठावर बिबट्याने एका वासरूचा फडश्याप पडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.
सविस्तर माहिती की, गेल्या दोन महिन्यांपासून आतापर्यंत पाचवी घटना घडली असून याकडे वनविभागाकडून कारवाईची उदासिनता दिसून येत आहे. वनविभागाचे कर्मचारी पंचनामा करून घेवून पुन्हा याकडे दुर्लक्ष केले जाते. बिबट्याला पकडून जेरबंद करण्याची मागणी वारंवार करूनही याकडे दुलक्ष केले जात असल्याची ओरड ग्रामस्थांकडून केली जात आहे. बिबट्यामुळे एखाद्या पुरूषाचा बळी गेला तर याला जबाबदार कोण राहील असा सवाल केला जात आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी धरणगाव तहसीलदार नितींकुमार देवरे यांच्याकडे तक्रार केली आहे. तहसीलदारांनी याची दखल घेत वनविभागाला कारवाईच्या सुचना दिलेत.