पाचोरा : प्रतिनिधी
उसनवारीचे पैसे परत केले नाहीत, याचा राग येऊन दोघांनी घरात घुसून महिलेसह तिच्या पतीला मारहाण केली. महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दिनेश पाटील व अमोल पाटील यांच्याकडून पीडित महिलेच्या पतीने पैसे घेतले होते- दोघांनी उसनवारीचे पैसे घेण्यासाठी वारंवार तगादा लावला. मात्र पीडितेच्या पतीने पैसे परत केले नाहीत. याचा राग येऊन दोघांनी पीडितेच्या घरी जाऊना शिवीगाळ करीत गैरवर्तन केले. पती क पत्नीला मारहाण केली. ही घटना २७ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी पोलिसात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेको भगवान बडगुजर करीत आहेत.