Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथ पूजनाने झाला दिंडीस प्रारंभ
    अमळनेर

    शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथ पूजनाने झाला दिंडीस प्रारंभ

    editor deskBy editor deskFebruary 2, 2024Updated:February 2, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सानेगुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय,अमळनेर (जि. जळगाव) : प्रतिनिधी

    शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीस महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रविंद्र शोभणे, संमेलनाध्यक्ष तथा राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अमळनेरच्या मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, माजी आमदार स्मिता वाघ यांच्या सह मराठी साहित्य महामंडळ व मराठी वाड्:मय मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्रीसंत सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल संस्थान (वाडी संस्थान) येथून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीच्या पालखीत दासबोध, श्री ज्ञानेश्वरी, भारताचे संविधान, श्रीमद्‌‍ भगवतगीता, भारतीय संस्कृती या ग्रंथ गुरूंचा समावेश होता.

    सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडीस सुरवात होणार असल्याने अमळनेर शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी. प्राध्यापक, शिक्ष्ाक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी याच्यासह सुमारे 4 हजार सारस्वतां च्या गर्दीने अमळनेर शहर फुलले होते. दिंडी जशजशी पुढे पुढे जात होती तस तशी दिडीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जात होता. यामुळे मराठी सारस्वतांचा उत्साह अधिकच व्दिगुनीत होत होता.

    ग्रंथदिंडीच्या मार्गापासून तर दिंडी पान खिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, राणी लक्ष्मीबाई, सुभाष चौक ,स्टेट बॅंक, पोस्ट ऑफिस, नाट्यगृह, उड्डाणपूल या चौकात विविध रांगोळी काढून ग्रंथांसह सारस्वतांचे स्वागत केले. सकाळी 8 वाजता सुरू झालेली दिंडी संमेलन स्थळी दहा वाजता पोहचली. मंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष्ा अशोक जैन, केशव स्मृती सेवा संस्था समूहाचे अध्यक्ष्ा डॉ, भरतदादा अमळकर यांनीही या दिंडीत सहभाग घेत एक किलो मिटर अंतर पायी चालले, तर मंत्री महाजन यांनी दंडी मार्गावरील विविध थोर महापुरूषांच्या पुतळ्यांना मार्ल्यापर्ण करून अभिवादन केले.

    या संस्थानांचा होता सहभाग

    केशव शंखनाद पथक, पुणे, खान्देश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय,महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्रचार्य, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, एनएसएस, एनसीसी, वसतीगृह विद्यार्थ्यांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, ढोल ताशा पथक, गंगराम सखाराम शाळा अमळनेर, द्रो. रा. कन्या शाळा, अमळनेर, प्रताप हायस्कूल, अमळनेर, मंगळग्रह संस्थान ग्रंथ पालखी, स्वामी विवेकानंद शाळा, बंजारा समाज पारंपरिक नृत्य चाळीसगाव, धनगर समाज पारंपारिक नृत्य, वासुदेव पथक जामनेर, नवलभाऊ प्रतिष्ठान आर्मी स्कूल, सावित्रीबाई फुले शाळा अमळनेर, साने गुरूजी शाळा, नगर परिषद सर्व कर्मचारी अमळनेर, मराठी वाड:मंय मंडळाचे सर्व समिती सदस्य, वारकरी पाठशाळा अमळनेर, नंदगाव माध्यमिक विद्यालय, भरवस माध्यमिक विद्यालय, पोलीस प्रशासन, प्रांताअधिकारी, महराष्ट्र मतदान विभाग, फार्मसी महाविद्यालय, एसएनडीटी कॉलेज, एमएसडब्लू कॉलेज, टाकरखेडा माध्यमिक हायस्कूल, उदय माध्यमिक विद्यालय, चौबारी माध्यमिक विद्यालय, रणाईचा माध्यमिक आश्रमशाळा, हातेड माध्यमिक शाळा, कोळपिंप्री माध्यमिक विद्यालय, शारदा माध्यमिक शाळा कळमसरे, पी. एन. मुंदडा माध्यमिक शाळा, इंदिरा गांधी माध्यमिक शाळा, गडखांब माध्यमिक व उच्च माधमिक कॉलेज

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    नशिराबाद नगरपालिकेचा निकाल जाहीर; नगराध्यक्षपदी योगेश पाटील !

    December 21, 2025

    मुक्ताईनगरमध्ये सत्ता बदलाचा धक्का; रक्षा खडसे यांची प्रतिष्ठा पणाला, संजना पाटील विजयी

    December 21, 2025

    मोठी बातमी : मतमोजणीला सुरुवात, भाजप पुढे; महायुती 150 जागांवर आघाडीवर !

    December 21, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.