• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सकाळच्या सुमारास शेतकऱ्याला लुटले

editor desk by editor desk
February 2, 2024
in क्राईम, जळगाव, जामनेर
0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील पहूर कसबेतील रहिवासी रामदास बिंबाजी जाधव हे सकाळी साडेआठच्या दरम्यान शेतात दुचाकीने जात असताना छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गाच्या बाजूला असलेल्या नामलीला जिनिंगजवळ चार युवकांनी दुचाकी अडवली. गळ्यातील एक तोळा व बोटातील तीन ग्रॅम वजनाची अंगठी हिसकावून पोबारा केला आहे. दिवसा घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता रामदास बिंबाजी जाधव हे छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पेट्रोल पंपावरून दुचाकीत पेट्रोल भरून जळगाव महामार्गावर असलेल्या नामलिला जिनिंगजवळ असलेल्या शेताजवळ पोहोचले. यादरम्यान जळगावकडून एका दुचाकीवर दोन युवक व पहूरकडून एका दुचाकीवरून दोन युवक अशा चौघांनी जाधव यांना अडविले. त्यांच्यावर पांढरी पावडर टाकण्याचा प्रयत्न केला.

गळ्यातील सोनसाखळी व अंगठी ओरबाडून घेत असताना शेजारील शेतात असलेल्या मजूर महिलांनी हे पाहून आरडाओरड केली. त्यामुळे चौघांनी दुचाकीवरून पहूरच्या दिशेकडे पोबारा केला. दिवसा घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर ढाकरे व गोपाळ माळी यांनी रामदास जाधव यांच्याकडून माहिती घेत तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात उशिरापर्यंत तक्रारदारांनी तक्रार दाखल केली नव्हती.

Previous Post

जळगावात २८ वर्षीय तरुणाने घेतला गळफास

Next Post

पतीवर कर्जाचा डोंगर अन विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

Next Post
पतीवर कर्जाचा डोंगर अन विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

पतीवर कर्जाचा डोंगर अन विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group