धरणगाव लक्ष्मण पाटील : स्थानीय महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक एस.व्ही.आढावे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील गणित शिक्षक सी.एम.भोळे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका पी. आर.सोनवणे ज्येष्ठ शिक्षिका एम.के.कापडणे पर्यवेक्षक जे.एस.पवार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शाळेतील गणित विषय शिक्षिका एम.जे.महाजन यांनी रामानुजन यांचा जीवन संघर्ष सांगितला. त्यांच्या भौमितिक रचना, प्रमेय आणि गणितावर असणारे नित्तांत प्रेम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गणित दिवसाचे औचित्य साधून शाळेमध्ये रांगोळी, रंगभरण, हस्तकला स्पर्धेचे आयोजन केले होते. परीक्षक म्हणून शाळेतील कलाशिक्षक हेमंत माळी यांनी काम पाहिले व विजेत्या विद्यार्थ्यांची नावे घोषित केली. रांगोळी स्पर्धेमध्ये ९ वी मधील विद्यार्थीनी प्रथम हर्षाली सरदार व निलीमा महाजन द्वितीय योगिता महाजन व दुर्गा जाधव, तृतीय हर्षदा महाजन, रंगभरण स्पर्धेमध्ये प्रथम ५ वी मधील विद्यार्थीनी जया सोनवणे, ६ वी मधील विद्यार्थी द्वितीय वैभव माळी, तृतीय ७ वी मधील विद्यार्थीनी कोमल भोई, हस्तकला स्पर्धेमध्ये प्रथम ८ वी मधील विद्यार्थीनी भारती गायकवाड आली. या सर्व विद्यार्थ्यांना कंपासपेटी, शैक्षणिक साहित्य व रोख बक्षिसे शाळेतील मुख्याध्यापक, गणित विषय शिक्षक एम. बी.मोरे व शिक्षक वृंद यांच्या हस्ते देण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सी.एम. भोळे यांनी गणित विषयाचे महत्व सांगून गणित विषयाची मैत्री करा.असा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.व्ही.आढावे तर आभार पी.डी.पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व गणित विषय शिक्षक बंधू-भगिनी यांनी सहकार्य केले.