Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वारकरी संप्रदायानेच सनातन संस्कृती टिकवित आहे.- पालकमंत्री गुलाबराव पाटील
    जळगाव

    वारकरी संप्रदायानेच सनातन संस्कृती टिकवित आहे.- पालकमंत्री गुलाबराव पाटील

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 1, 2024Updated:February 1, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव तालुक्यातील वारकरी भजनी मंडळांना झाले साहित्याचे वाटप

    जळगाव प्रतिनिधी दि. ०१ – सांस्कृतिक व धार्मिक परंपरा टिकून ठेवण्यासाठी भजनी साहित्य वाटप केले जात आहे. जीवनाची वाट सुकर होण्यासाठी वारकरी संप्रदायाचे विचार समाजाला तारू शकतो. वारकरी संप्रदायाने सनातन संस्कृती टिकवली असून गावा – गावात संप्रदाय वाढवाला आहे. असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. वडली येथील भाऊसो गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालयात दुसऱ्या टप्यातील भजनी साहित्य वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व मित्र परिवाराने केले होते. या अत्यंत शिस्तबद्ध व अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सकाळी ह.भ.प. देवगोपालजी शास्त्री यांचे सुश्राव्य हरिकीर्तन झाले. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव व जळगाव तालुक्यातील २१ भजनी मंडळांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

    पहिल्या टप्यात ५७ आज दुसऱ्या टप्प्यात २१ गावांना भजनी साहित्य वाटप !

    श्रीक्षेत्र आळंदी पंढरीचा वारसा जपणारा जळगाव व धरणगाव तालुका हा वारकरी संप्रदायात विखुरला आहे. ग्रामीण भागात भजन, किर्तन, हरिनामाचा सप्ताह असे विविध कार्यक्रमाच्या माऊलींच्या हरिनामाचा गजर गावागावांत होत असतो. मात्र, याच हरिनामाला जोड लागते असं म्हणतात लाऊणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्म रस आवडीने म्हणून टाळ मृदंग विना व पेटी यांच्या खूप गरज असते हिच गरज ओळखुन पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघातील जळगाव तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यात २१ गावांना भजनी साहित्य वाटप करण्यात आले. मागील महिन्यात धरणगाव व जळगाव तालुक्यातील ५७ भजनी मंडळाना साहित्य वाटप करण्यात आले होते.

    गुलाब भाऊ म्हणजे राजकारणातले वारकरी – ह.भ.प.गजानन महाराज वरसाडेकर

    याप्रसंगी ह.भ.प.गजानन महाराज वरसाडेकर यांनी तळागाळात वारकरी संप्रदाय रुजविण्याचे काम वारकरी करीत असतो. गुलाबभाऊंच्या माध्यमातून खान्देशाला उज्जवल नेतृत्व लाभले आहे. या साहित्याच्या माध्यमातून प्रत्येक गावात टाळ, मृदृगाचा आवाजाचे पुण्य गुलाबभाऊंना लाभणार असून पालकमंत्री गुलाब भाऊ म्हणजे राजकारणातले वारकरी असल्याचे प्रतिपादन श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा टस्ट्रचे अध्यक्ष तथा गौप्रेमी ह.भ.प.गजानन महाराज यांनी सांगितले.

    याच महिन्यात होणार वारकरी भवनाचे भूमी पूजन !

    जळगाव शहरातील खेडी परिसरात वारकरी भवनाच्या ६ कोटी ६ लक्ष्च्या मंजुरी दिली असून वारकरी संप्रदायाला उत्सुकता लागून असलेल्या या कामाचे याच महिन्यात कामाचे भूमिपूजन करणार असून वारकरी भवनाच्या लगतच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरणलाही सुरुवात झाली आहे. जिल्हास्तरीय वारकरी भवन होणार असल्याने त्याचा भावी पिढीला फायदा होणार असून त्याचा मनस्वी आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

    प्रस्ताविकात माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील म्हणाले की, संतांचा वारसा टिकविण्याचे काम वारकरी संप्रदाय करीत असून सहकार्य म्हणून यापूर्वी ५७ तर आज २१ भजनी मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले आहे. समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या वारकरी सांप्रदायाला सदैव सहकार्य राहणार असल्याची ग्वाही प्रतापराव पाटील यांनी दिली. सूत्रसंचालन ह.भ.प. प्रा.सी एस पाटील यांनी केले. आभार सुशील महाराज विटनेरकर व माजी सरपंच सचिन पाटील यांनी मानले. हेमंत पाटील, रोशनी चव्हाण व नंदिनी चव्हाण या शालेय विद्यार्थ्यांची भाषणे झाली. लाभधारक वारकर्‍यांच्या वतीने जितू महाराज म्हसावद यांनी मनोगत व्यक्त केले.

    यांची होती उपस्थिती
    याप्रसंगी ह.भ.प. देवगोपाल महाराज शास्त्री , ह.भ.प. बाबा परमहंस जी महाराज, ह.भ.प.चतुर्भुज महाराज धरणगावकर, ह.भ.प.पांडुरंग महाराज आवरकरह.भ.प. शाम महाराज शास्त्री पिंपळगावकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर, ह.भ.प. सुशील महाराज विटनेरकर, ह.भ.प. प्रतिभाताई महाराज जवखेडेकर,
    ह.भ.प. कैलास महाराज चोपडाईकर, ह.भ.प. विठ्ठल महाराज आडगावकर, जिल्हा प्रमुख निलेश पाटील , जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, महिला जिल्हा प्रमुख सरिताताई कोल्हे – माळी उपजिल्हाप्रमुख पी.एम पाटील सर, अनिल भोळे, नाना भाऊ सोनावणे , विक्रम पाटील, शाळेचे चेरमन विक्रम पाटील, तालुका प्रमुख शिवराज पाटील दुध संघाचे रमेश आप्पा पाटील, माजी सरपंच सचिन पाटील, परिसरातील सरपंच गोविंद पवार, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, विनोद पाटील, शिरीष पाटील सर, , गोविंद मंडपे, सुरवाडे , धोंडू जगताप , समाधान चिंचोरे, शीतल ताई चिंचोरे, शेतकी संघाचे विजय पाटील, अरुजन पाटील, भगवान पाटील, गजानन सोनवणे, संदीप सुरळकर, सभापती, मुकुंदराव नन्नवरे, अनिल पाटील सचिन पवार , जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व सरपंच , वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भरधाव विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली : 35 जखमी, 5 गंभीर !

    December 2, 2025

    २२६ नगरपरिषद-३८ नगरपंचायतींसाठी आज मतदान; सकाळपासून मतदारांची गर्दी !

    December 2, 2025

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.