Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » परिवारातील तिघांनी संपविली आयुष्य ; परिसरात खळबळ
    क्राईम

    परिवारातील तिघांनी संपविली आयुष्य ; परिसरात खळबळ

    editor deskBy editor deskJanuary 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशातील अनेक राज्यात धक्कादायक घटना घडत असतांना नुकतेच मध्यप्रदेशातून अशीच एक घटना उघडकीस आली आहे. पती पत्नीसह एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीवरुन या आत्महत्येचे धक्कादायक कारणही समोर आले आहे.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुरावली भागात राहणारे जितेंद्र झा हे मजुरीचे काम करतात. जितेंद्र यांची पत्नी त्रिवेणी आणि मुलगा अचल झा त्यांच्यासोबत राहते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे बंद होते. रविवारी (२८, जानेवारी) शेजारी राहणाऱ्या लोकांना दुर्गंधी येत होती. यानंतर लोकांना संशय आल्याने याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली.

    माहिती मिळताच सिरोल पोलीस ठाण्याचे प्रभारी विनयसिंह तोमर फौजफाट्यासह दाखल झाले. आत गेल्यावर घरातले दृश्य पाहून पोलीसही हादरुन गेले. घरामध्ये पती, पत्नी आणि मुलाचा मृतदेह दोरीला लटकत असल्याचे दिसले. तसेच जितेंद्र झा यांच्या हातावर ब्लेड, चाकूच्या खुणाही आहेत. दरम्यान, या घटेनंतर फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा खून आणि आत्महत्येच्या दृष्टीने तपास करत आहेत. घटनास्थळी मुलगा अचल झा याच्याकडे एक चिठ्ठी सापडली. ज्यामध्ये एका व्यक्तीच्या नाराजीमुळे मुलाने आत्महत्या केली आता मीही आत्महत्या करणार आहे, असे म्हटले आहे. पोलीस या प्रकरणाचा आता अधिक तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.