भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरात २५ वर्षीय महिलेचा एकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एका विरोधात भुसावळ बाजार पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका परिसरात २५ वर्षीय महिला वास्तव्यास असून सप्टेबर २०२३ मध्ये महिलेच्या आईला रुग्णालयात दाखल केले असतांना संशयित आरोपीने महिलेला भुसावळ येथील त्याच्या मालकीच्या घरी नेत तुला मी घर खर्चासाठी, कपडे घेण्यासाठी, मुलाला चांगले शाळेत शिकविण्याचे आमिष देत वेळोवेळी २५ वर्षीय महिलेवर अत्याचार केला, याप्रकरणी महिलेने दि.२८ जानेवारी २०२४ रोजी भुसावळ बाजार पेठ पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेडकोळी हे करीत आहेत.