जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात अनेक दिवसापासून बेकायदेशीर पद्धतीने वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. बेकायदेशीर वाळूची वाहतूक असल्याने अनेक चालक हे डंपर भरधाव वेगाने पळवत असल्याने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नेहमीच अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच जामनेर – एरंडोल रस्त्यावर भरधाव डंपरने दुचाकीस्वाला उडविले आहे. यात ६४ वर्षीय वृद्ध जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील पळासखेडा मिराचे येथे जामनेर एरंडोल रस्त्यावर सकाळी ६ घ्या सुमारास नि.पं.पाटील हायस्कूलच्या पुढे दर्ग्यआजवळ भरधाव वेगाने रेती वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाचे डंपरने मोटारसायकल क्रमांक MH 19DN 7914 जळके येथील रहिवासी असलेल्या कमलाकर मोतीराम पाटील वय वर्षे ६४ हे आपल्या यांना जबर धडक दिल्याने जागीच ठार झाले . कमलाकर पाटील हे जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथे आपल्या नातेवाईकांनकडील दशक्रिया विधीसाठी कार्यक्रमासाठी जात होते
अपघात झाल्यानंतर रेती वाहतूक करणाऱ्या डंपराचा चालक पळून गेल्याची माहिती मिळते.सदर अपघाताची माहिती पळासखेडा पोलीस पाटील प्रकाश बिचारे यांनी पोलिस दुरक्षेत्र नेरी येथील हे.कॉ.अतुल पवार यांना दुरध्वनी द्वारे दिली तसेच अपघातातील रेती वाहतूक डंपरची चाबी त्यांनी स्वतः जवळ घेतली त्यानंतर पोलिस पाटील हे घरी गेले त्यावेळेस रेती डंपर हे घटनास्थळावरून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या रस्त्यावर रेती वाहतूक करणारे विना क्रमांकाचे डंपर कोणाच्या आशीर्वादाने चालतात ही चर्चा परिसरात सुरू आहे