लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : बस कर्मचाऱ्यांचा संप येत्या दोन दिवसात नही मोडल्यास स्वतः बस स्थानकातून बस बाहेर काढणार असे वक्तव्य आमदार चंद्रकांत पाटील यांनी काढले.
गेल्या दीड महिन्यापासून बस कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे शासनाने त्यांच्या बऱ्याचशा मागण्या मान्य केले असले तरीही शासन विलीनचा प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळे अजूनही बस कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे या संपामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहे आज सकाळी गारखेडा येथे ॲपे रिक्षा छोटा मिनी ट्रक यात झालेल्या अपघातात तीन जण दगावले.
यावर बोलताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की बस आगरा मध्ये असलेल्या कार्यक्रमात गेलो असता बस कर्मचाऱ्यांना दोन दिवसाचे अल्टिमेटम दिले असून दोन दिवसात बस पूर्ववत सुरू न झाल्यास मी स्वतः बसस्थानकातून बस सुरू करणार असून ती बस जळगाव पर्यंत देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहे त्यात बस संप असल्याने नागरिकांना व प्रवाशांना नाईलाजास्तव खाली पिली रिक्षाने प्रवास करावा लागत आहे हा प्रवास करताना मोठ्या प्रमाणात प्रवासी भरून या वाहनातून वाहतूक होत आहे बस कर्मचाऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचा आहे मात्र प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करत करावा लागत असल्याने दोन दिवसात त्यांनी संप मोडीत न काढल्यास आगारातून सर्व बस चालवत बाहेर काढण्याचा इशारा वजा अल्टीमेटम आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे