जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचे आवाहन
जळगाव ;- जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर पोलिस शिपाईपदाच्या १२८ रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन सादर केलेल्या अर्जात आवश्यक तो बदल करण्यासाठीच्या कालावधीत २२ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाढ करण्यात करण्यात आली आहे. उमेदवारांनी महापोलिस या संकेतस्थळावर पोलिस कॉर्नर बटनला क्लिक करुन पासवर्ड बदलावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे.
पोलिस शिपाई पदाच्या १२८ रिक्त पदांची भरतीसाठी ३ सप्टेंबर रोजी जाहीरात देण्यात आली होती. शासनाने मराठा समाजासाठी निर्माण केलेला एसईबीसी प्रवर्गासाठी काही जागा राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या. सुप्रीम काेर्टाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्याने मराठा समाजाच्या उमेदवारांना खुला किंवा ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा पर्याय निवडण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. सर्व उमेदवारांना ऑनलाइन पासवर्ड बदल करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यात २२ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या पोलिस शिपाई भरती प्रक्रियेसाठी ओएमआर वंेडर न्यास कम्युनिकेशन प्रा. लि. मुंबई यांची निवड करण्यात आली आहे.
उमेदवारांच्या मदतीसाठी मदत कक्ष स्थापन : पोलिस भरतीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. मानव संसाधनचे पोलिस निरीक्षकांची तेथे समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक ९८२१६६५६९३ तर कक्षातील दूरध्वनी क्रमांक (०२५७) २२३३५६९ असा आहे. जिल्हा पोलिस शिपाई भरतीसाठी गणेशोत्सवापूर्वी लेखी परीक्षेचे आयोजन करण्याचे नियोजन वंेडर व पोलिस दलाकडून करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शी पध्दतीने राबवण्यात येत असून त्यात कुणालाही हस्तक्षेप करता येणार नाही. तसेच एजंट, बाहेरच्या दलाल लोकांनी उमेदवारांकडून पैशांची मागणी केल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.