Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » देवघरात ठेवलेला डबा चोरट्यांनी लांबविला !
    क्राईम

    देवघरात ठेवलेला डबा चोरट्यांनी लांबविला !

    editor deskBy editor deskJanuary 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील काही भागात नियमित चोरीच्या घटना घडत असतांना नुकतेच दि. २२ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास रिंगरोडवरील फॉरेस्ट कॉलनीत देखील चोरीची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील फॉरेस्ट कॉलनीतील तृष्णा अपार्टमेंटमध्ये रुपाली मुकेश पुर्णपात्रे या वास्तव्यास असून दि. २१ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास त्यांना मंदिरात जायचे असल्याने त्यांनी देवघरात ठेवलेल्या डब्यातून पैसे घेवून त्या मंदिरात गेल्या. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्या घरी परतल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे रुपाली पुर्णपात्रे या देवघर स्वच्छ करीत होत्या. यावेळी त्या त्यांच्या पतीने दिलेले पैसे ठेवण्यासाठी त्या डबा शोधत असतांना त्यांना देवघरात ठेवलेला डबा दिसून आला नाही. त्यांनी त्यांच्या सासूबाईंकडे याबाबत विचारणा केली. परंतु त्यांना देखील त्याबाबत काहीच माहिती नव्हते. यावेळी रुपाली पुर्णपात्रे यांना घरात चोरी झाल्याची खात्री झाली. त्यांनी लागलीच जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विद्यार्थी-शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी भाजपला रामराम! अमळनेरचे श्याम पाटील यांचा सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

    July 26, 2026

    संसाराच्या उंबरठ्यावर रक्ताचे डाग; दारूच्या पैशावरून पत्नीचा दुर्दैवी अंत

    July 26, 2026

    कामावरून घरी परतताना काळाचा घाला; जळगावात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    July 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.