जळगाव : प्रतिनिधी
शहरातील भाऊसाहेब राऊत विद्यालयात झालेल्या चोरीचा छडा जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने लावला आहे. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा चौकशी करीत गुन्हा दाखल झाल्यानंतर दुस-याच दिवशी तपास लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील भाऊसाहेब राऊत विद्यालयात दिनांक १९ जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 05:20 ते दि. 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान क्रिडा दालनाच्या रुमचा कडी कोंडा तोडून त्यातील पाच नग सिलींग फॅन व एक नग ताशा असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरी केला होता. शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण सुका तायडे यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दि. 23 जानेवारी 2024 रोजी या चोरीच्या घटनेप्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पो.नि. डॉ. विशाल जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ. सलीम तडवी, पो.ना. जुबेर तडवी, पो.कॉ. अमितकुमार मराठे आदींनी तांत्रीक तपासासह गोपनीय माहितीच्याआधारे जळगांव शहरातील दोघा संशयीत आरोपींना चौकशीकामी ताब्यात घेतले. त्यांनी चोरीचा गुन्हा कबुल करत मुद्देमाल भंगार व्यावसायीकास विक्री केल्याचे कबुल केले.
विशाल ऊर्फ ऑस्टीन युवराज सोनवणे (रा. पॉवर हाऊस, जळगांव) आणि आकाश ऊर्फ चिरक्या जगताप (रा. पिंप्राळा, जळगांव) या दोघा चोरट्यांसह चोरीचा माल विकत घेणारा शेख जुबेर शेख मोहम्मद अशा तिघांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. चोरीचा संपुर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्यासह पो.हे.कॉ. सलीम तडवी, पो.ना. जुबेर तडवी, पो.कॉ. अमितकुमार मराठे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला. पुढील तपास पो.हे.कॉ. नरेश सोनवणे करत आहेत.