Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तिहेरी अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू
    क्राईम

    तिहेरी अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू

    editor deskBy editor deskJanuary 24, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदनगर : वृत्तसंस्था

    राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. कल्याण-नगर महामार्गावर एक एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर अशा तीन वाहनांची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. बुधवारी पहाटे २ 2.30 च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण निर्मल महामार्गावर उस वाहतुक करणारा ट्रक्टर व ठाणे – मेहकर एस.टी बस आणि इको गाडी यांची ढवळपुरी फाटया जवळ पहाटेच्या सुमारास जोरदार धडक झाली. त्यामध्ये सहा जण जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता, की यामध्ये तिन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भयानक घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

    अपघातातील जखमींना प्राथामिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान अपघातग्रस्तांची ओळख पटविण्याचे काम चालू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जिथे सनई वाजणार होती… तिथेच पसरली शोककळा; अपघातात पित्याचा अंत

    March 14, 2026

    गॅस टंचाईचा फटका शिर्डीत; साई भक्तांना आता फक्त एकच लाडू प्रसाद

    March 14, 2026

    जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला !

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.