मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. रोहित पवार यांच्या समर्थनात शरद पवार गटाने शक्तीप्रदर्शन केलं आहे. शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे.
कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर जमले आहेत. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील केली जात आहे.
रोहित पवार सकाळी १०.३० ते ११ वाजेपर्यंत ईडी कार्यालयात पोहोचणार आहे. रोहित पवार यांची ईडी चौकशी संपेपर्यंत शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयातच बसून राहणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे स्वत: रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत. रोहित पवार यांनीदेखील ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं म्हटलं आहे.