जळगाव : प्रतिनिधी
मध्यप्रदेश, गुजरातसह राज्यात विविध ठिकाणी बंद घर फोडून चोरी करणाऱ्या टोळीतील जियाऊल्ला खान असदऊल्ला खान (वय ६० रा. नांदुरा जि. बुलढाणा), सैय्यद अफसर सय्यद अजगर (वय २२ रा. पिंप्राळा हुडको) या दोघांच्या रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने सोमवारी पिंप्राळा हुडको परिसरातून मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील घरफोडी आणि ऑडीटर कॉलनीतील घरफोडी केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही घरफोडी करणारी टोळी ही सैय्यद अफसर याच्या पिंप्राळा हुडको येथील घरात राहत असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ सुशिल चौधरी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांना दिली. त्यानुसार पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
सोमवार दि. २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पोहेकॉ संजय सपकाळे, सुशिल चौधरी, जितेंद्र राजपूत यांनी कारवाई करत संशयित जियाऊल्ला खान असदऊल्ला खान व सैय्यद अफसर सय्यद अजगर या दोघांना अटक केली.
आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता दोघांना अटक केल्याचे कळताच त्यांचा तिसरा साथीदार हा फरार झाला आहे. त्यांनी घरफोडी करण्याकरीत वापरलेली रिक्षा देखील जप्त केली आहे. त्यांनी दोन्ही घरफोडीसह बुलढाणा जिल्ह्यात आणि मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यात केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पथकाची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि विठ्ठल पाटील, तसेच पोहेकॉ जितेंद्र राजपूत, पोहेकॉ संजय सपकाळे, सुशिल चौधरी, पोहेकॉ इरफान मलिक, पो.ना. हेमंत कळसकर, पो.ना. विनोद सुर्यवंशी, पो.कॉ. उमेश पवार, पोकॉ जुलालसिंग परदेशी आदींनी ही कारवाई केली आहे.