मुंबई : वृत्तसंस्था
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकतेच नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी मुख्यमंत्री शिंदेवर जोरदार हल्लाबोल केल्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रतिउत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची पाहणी आज केली यावेळी माध्यमांशी बोलत होते. ‘जो राम का नही वो किती काम का नही’ असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. केली. रामाने त्यांना (उद्धव ठाकरेंना) सद्बुद्धी द्यावी, काँग्रेसला बाळासाहेबांनी विरोध केला त्यांना त्यानी सत्तेत घेतलं. लग्न एकाबरोबर संसार एकाबरोबर आणि हानीमून एकासोबत केलं. सत्तेच्या खूर्चीसाठी आणि अहंकारापोटी ते वागत आहेत त्यामुळे लोकं त्यांना सोडून जात आहेत, असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आलं. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली होती. अनेकांनी रामाचे मुखवटे घातले आहेत. पण तुम्ही माझी तुलना रामाशी केली नाही त्यासाठी धन्यवाद. जो महाराष्ट्रावर चालून आला, त्याला महाराष्ट्राने मूठमाती दिली. राम एका पक्षाची मालमत्ता नाही. नाहीतर आम्हाला भाजपमुक्त श्रीराम करावा लागेल, असा टोला ठाकरेंनी लगावला. त्याला मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिलं.
राम मंदिरांना ज्यांनी विरोध केला त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती काल झाली, ते साहेबांचे स्वप्न होते. अयोध्येतील प्रभू श्री रामाचं मंदिरचं काल लोकार्पण झालं. ज्यांनी हे राम मंदिर उभं केलं. ५०० वर्षाचा वनवास संपवला, त्या मोदींचे मी आभार मानतो, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पुढे बोलताना म्हणाले की, बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवणार आहेत. आज मुंबईत संपूर्ण मतदार ११ हजार दिव्यांचे प्रज्वलंन होईल. मी बाळासाहेब यांना अपेक्षित असलेलं सरकार काम करत आहे.
सर्व घटकातील नागरिकांना न्याय देण्याचं काम आम्ही करतोय. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न करतोय. साहेबांच्या नावे समृदधी महामार्गाला दिले, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.