नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात राम मंदिराचा उद्घाटन उत्साह सुरु असतांना दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावामध्ये घसरण होईल, अशी सर्वांनाच आशा होती. परंतु आता ग्राहकांच्या या आशेची निराशा झाली आहे. कारण मंगळवारी सोन्याच्या भावामध्ये कोणतीही घसरण झालेली नाही.मात्र दुसऱ्या बाजूला चांदीचे भाव घसरले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना सोन्याऐवजी चांदी खरेदीवर जास्त भर द्यावा लागणार आहे. अशा स्थितीत तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पहिले आजचे भाव तपासा.
Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,800 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,050 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,800 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 63,050 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी काही काळ वाट पहावी लागणार आहे.
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 57,800 रुपये
मुंबई – 57,800 रुपये
नागपूर – 57,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 63,050 रूपये
मुंबई – 63,050 रूपये
नागपूर – 63,050 रूपये
आज बऱ्याच काळानंतर चांदीच्या भावामध्ये घसरण झाली आहे. मंगळवारी 10 ग्रॅम चांदीचा भाव 750 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,500 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 75,000 अशी आहे. एकीकडे सोन्याचे भाव वाढले असताना चांदीच्या किमतीत घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.