Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक द्या ; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
    जळगाव

    लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक द्या ; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 20, 2021No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही असे वातावरण तयार करण्यात येत आहे

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राज्यात एक वातावरण तयार करण्याचे प्रयत्न केला जात आहेत ते राज्यात कायदा व शिस्त राहिली नाही पोलिसांचे नियंत्रण समाजावर राहिलेले नाही.तसेच आपल्या कडे येणारे  लोकप्रतिनिधी हे आपल्या कामासाठी येत नाही ते लोकांची समस्या घेऊन येतात त्यांना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सन्मानाची वागणूक द्यावी अशा कानपिचक्या आज राज्याचे गृहमंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांनीपोलीस मुख्यालय इमारतीचे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या घरांचे उद्घाटन कार्यक्रमात बोलताना काढले.

    जळगाव येथील पोलीस मुख्यालय मारुती व पोलिस इमारतीचे उद्घाटन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार किशोर पाटील आमदार अनिल भाईदास पाटील आमदार सुरेश गोरे महापौर जयश्री महाजन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पोलीस उपमहानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र डॉक्टर बी जी शेखर पाटील, पोलीस अधीक्षक जळगाव डॉक्टर प्रवीण मुंढे उपस्थित होते.

    उद्घाटनपर कार्यक्रमात बोलताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की आज राज्यांमध्ये एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे या राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही राज्यामध्ये शासनाचे व पोलिसांचे नियंत्रण समाजावर राहिलेले नाही क्राईम थोड्या प्रमाणात वाढल्या असे त्यांनी सांगितले मात्र क्राइम कंट्रोल करण्याची जबाबदारी फक्त जिल्हा पोलिस अधीक्षकांची नसून त्या भागातील ठाण्याचा प्रमुख व सर्व कर्मचाऱ्यांची एकत्रित जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

    आपले आजकाल चर्चा बाहेर घडवून आणली जाते आहे खान्देश जिल्ह्यामध्ये चुकीचे असेल त्याची दुरुस्ती करण्याचा व नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न झाला पाहिजे यामध्ये राजकीय कोणीही मध्ये पडणार नाही अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिली त्यासाठीचपोलीस उपमहानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र डॉक्टर बी जी शेखर पाटील, आपली नियुक्ती केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यापुढे त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना कानपिचक्या घेत सांगितले की लोकप्रतिनिधीसुद्धा महत्त्वाचा भाग आहे आमदार असेल महापौर असे नगरसेवक असेल माजी आमदार असतील ते लोकांचे प्रश्न घेऊन आल्यावर त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे तसा जीआरही आहेत आणि तो पाळला गेला पाहिजे त्यांचे ते वैयक्तिक काम नसते ते सर्वांचे प्रश्न घेऊन येतात ते प्रश्न सोडवले गेलेच पाहिजे असे ते म्हणाले.

    आपले पोलिस बांधव हे रात्रंदिवस ड्युटी करतात रस्त्यावरील ड्युटी करतात त्यामुळे एक चांगले वातावरण चांगली इमारत चांगले घर देण्याचा आपला प्रयत्न आहेत आणि तसे ते पहिले प्राधान्य आहे पुढील काळात जळगाव जिल्ह्यात कुठे पोलिस ठाण्याची इमारत घर बांधण्याबाबत आपण बैठक घेऊन प्लॅन करून तसं तयार करू असे शब्दही त्यांनी यावेळी दिला.

    ड्रग्ज व शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न

    पोलीस भरती मध्ये पेपरफुटीचा प्रकार झाले नसल्याचे वक्तव्य करत जळगाव जिल्ह्यातील दुसऱ्या राज्याच्या सीमा लागू नसल्याने त्यासाठीच ही बैठक बोलावण्यात आलेली आहेत.
    जळगाव जिल्हा हा सीमेवर असल्याने अंमली पदार्थांसह शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे प्रकार वाढीस लागले आहे. या अनुषंगाने सीमावर्ती भागातील जिल्हा पोलीस अधिकार्‍यांना निर्देश देऊन एक कालबध्द कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आजच पत्रकारांशी बोलताना दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    निवडणूक स्वबळावर लढायच्या की महायुतीत : प्रदेशाध्यक्ष चव्हाण !

    October 17, 2025

    खळबळजनक : कुसुब्यात मुलाला दिसला वडिलांचा मृतदेह : परिवाराचा आक्रोश !

    October 17, 2025

    रेल्वेतून मोबाईल पडणाऱ्या चोरट्याला एलसीबीने घेतले ताब्यात !

    October 17, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.