Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » श्रीरामाचं दर्शन घडवून आणतो : महिलेची अडीच लाखात फसवणूक
    क्राईम

    श्रीरामाचं दर्शन घडवून आणतो : महिलेची अडीच लाखात फसवणूक

    editor deskBy editor deskJanuary 20, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    देशातील प्रत्येक रामभक्तांना अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या दर्शनाची ओढ लागली असतांना राम भक्तांना श्रीरामाच्या भेटीची आतुरता लागली आहे .याच भक्तीचा फायदा कल्याणमध्ये तिघांनी घेतल्याचं उघड झालं आहे .आम्ही तुम्हाला श्रीरामाचं दर्शन घडवून आणतो, असं आमिष दाखवून एका 58 वर्षीय महिलेचे सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले आहेत. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे . पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

    तक्रारदार महिला बुधवारी दुपारी खडकपाडा भागातून पायी चालली होती. यावेळी त्यांना तीन भामट्यांनी अडवले. आम्ही रामभक्त आहोत, आम्ही तुम्हाला प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवून आणतो. यासाठी तुम्ही तुमच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, इतर सोन्याचा ऐवज पिशवीत गुंडाळून ठेवा, असे भामट्यांनी महिलेला सांगितलं. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदार महिलेने आपल्या जवळील 2 लाख 66 हजाराचा सोन्याचा ऐवज पिशवीत गुंडाळला.

    पिशवीत गुंडाळलेला ऐवज कुणी चोरू नये असे सांगून स्वतःकडे घेतला. आपणास रामाचे दर्शन होत आहे या आनंदात महिला होती. या संधीचा फायदा घेत त्या तिघांनी दागिने घेऊन तेथून पळ काढला . आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने महात्मा फुले पोलीस स्थानकात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून खडकपाडा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्रीचा भीषण अपघात; काळे कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू !

    February 14, 2026

    महापालिकेत टिपू सुलतान प्रतिमेवरून वाद; शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

    February 14, 2026

    धक्कादायक : मध्यरात्री घरातून अल्पवयीन मुलीला पळविले !

    February 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.