Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पाण्याच्या वादाने शेतकऱ्यांला बेदम मारहाण
    क्राईम

    पाण्याच्या वादाने शेतकऱ्यांला बेदम मारहाण

    editor deskBy editor deskJanuary 19, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    शेतातील सामायिक ट्यूबवेलचे पाणी घेण्यावरून एका शेतकऱ्याला दोन जणांनी काठी व फावड्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना १७ रोजी भुसावळ तालुक्यातील वांजोळा शिवारात घडली. याप्रकरणी आपसातल्या दोघा नातेवाइकांविरोधात भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील बहिरूंबा बाबा मंदिराजवळील रहिवासी राजेंद्र यादव बावस्कर (५२) हे या घटनेत जखमी झाले आहेत. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी १७ रोजी सकाळी साडेनऊ वाजता ते वांजोळा शिवारातील त्यांच्या शेतात सामायिक ट्यूबवेलमधून पिकांना पाणी भरत होते. त्यावेळी रवींद्र यादव बावस्कर आणि पंकज रवींद्र बावस्कर (दोन्ही रा. खळवाडी, भुसावळ) यांनी राजेंद्र यांना मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी दुपारी ५ वाजता भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. वाल्मीक सोनवणे हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मोठी बातमी : रुपाली चाकणकरांना समन्स बजावले; भोंदू खरात प्रकरणाची चौकशी सुरू

    March 29, 2026

    गॅस टंचाईचा बळी : रांगेत उभ्या असताना ७० वर्षीय माजी सरपंचाचा मृत्यू

    March 29, 2026

    मुलीनेच वडिलांचा घेतला जीव! मिल्कशेकमध्ये विष देऊन पोलिस अधिकाऱ्याची हत्या

    March 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.