मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील लढा देत आहे. नुकतेच मुंबईतील आंदोनलाच्या तयारीसाठी घेतलेली येत्या २० जानेवारीला संपत आहे. त्याआधी सरकारकडून मनोज जरांगे यांनी मनधरणी करण्यात यश येताना दिसत नाही. बच्चू कडू यांनी तोडगा निघाल्याचा दावा केला होता. मात्र स्वत: मनोज जरांगे यांनी हा दावा खोडून काढला आहे.
मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत बच्चू कडू यांचा दावा खोडून काढला आहे. कोणताही तोडगा निघाला नाही, नुसती चर्चा सुरू आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं. चार महिन्यांपासून जी चर्चा सुरू आहे, तीच चर्चा अजूनही सुरू आहे.आधी नोंदी मिळालेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र द्या. सगेसोयरे व्याख्या स्पष्ट झालेली नाही. जे सांगितले ते काही टाकतात आणि काही टाकत नाही. सरकार तोडगा निघाला म्हणून दिशाभूल करत आहे. मी मरेपर्यंत मागे हटणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.