जळगाव : प्रतिनिधी
शहरातील गोविंदा रिक्षा थांब्याजवळ १६ जानेवारी रोजी रात्री हेमराज येसाजी चव्हाण (वय ३६, बालाजीपेठ, मारवाडी व्यायामशाळेजवळ) या तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. यात तरुण जखमी झाला असून, या वादात चौकात दगडफेकही झाली. हल्लेखोर दुचाकीने पसार झाल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गोविंदा रिक्षा थांब्याजवळ १६ जानेवारी रोजी रात्री पावणेअकरा वाजता येसाजी व त्याचा मित्र रोहन कुरकुरे हे पायी फिरत असताना भगवान सोनवणे याचा फोन आला व त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ का करतोय असे विचारल्यावर त्याने चौकातील डीपीजवळ असल्याचे सांगितले. तेथे गेल्यावर भगवान सोनवणे व इतर दोघांनी धक्काबुक्की करत एकाने चॉपर काढून पोटात वार केला. जखमी अवस्थेत रोहन कुरकुरे व तानाजी चव्हाण यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटे शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भगवान सोनवणे याला शिवाजीनगर येथून ताब्यात घेतले. साथीदार फरार झाले